
वांगं खूप लोकांना अावडत नाही म्हणे!! पण लहानपणी त्यांनी बैंगन राजा नावाचं कॅरेक्टर बघितलं नसेल, किंवा त्यांची जीभ निव्वळ दगड असेल, अजून काय?
येतो मग,
me, myself and much more
तुम्हाला पडवळाचा मुरंबा करता येतो? म्हणजे, पुलंच्या शब्दांत, एक पडवळ घ्यावं, ते उभं चिरावं, वगैरे वगैरे. माझी (खरं सांगायचं तर आमच्या बाबांची) एक पाककृती, जी मी पुढे लिहिणार आहे, तिचं नावंच ऐकून लोक तो मुरंबा खाल्ल्यासारखं तोंड करतात. साबुदाण्याची खिचडी? कांदा घालून?? पावनं, बरं वाटत नाही का काय?
आपल्याकडे साबुदाण्याला एक स्थान आहे, ते म्हणजे फक्त उपवासाच्या खाण्यात. नाही म्हणलं तरी, वड्यांनी साबुदाण्याला थोडंसं "चमचमीत खाणं" या सदरात आणण्याचा एक क्षीण प्रयत्न केला पण तोही फसला. आता तर अशी अवस्था आहे की साबुदाणा म्हणलं की डोळ्यासमोर एखादी मूर्ती, नाकासमोर उदबत्तीचा वास (ज्याने मला खोकला येतो) यायलाच पाहीजे. अशा वातावरणात, तुम्हीच सांगा, कांदा अश्या अत्यंत अधार्मिक प्रवृत्तीच्या मुलाशी साबुदाण्याच्या खिचडीसारख्या सुशील मुलीचं कोणता बाबा लग्न लावून देईल? (मी सध्या "मार्केट"मध्ये असल्याने माझ्या उपमाही तशाच)
पण जर तुम्ही असल्या पुरोगामी विचारांचे नसाल आणि नुसते पोहे उपमा खाउन कावले असाल तर कधीतरी एखाद्या रविवारी कु़टुंब माहेरी किंवा किटी पार्टीला गेल्याची संधी साधून ही खिचडी ट्राय मारा.
एक वाटी साबुदाणा - दोन-अडीच वाटी पाण्यात धुउन दीड-दोन तास भिजवून ठेवा.ते भिजले की त्यातलं जास्तीचं पाणी काढून त्यात चवीनुसार दाण्याचा कूट, मीठ, थोडंसं तिखट आणि चिमूटभर साखर टाकून बाजूला ठेवा.एक कांदा आणि एक हिरवी मिरची बारीक चिरा. कढईत तेल गरम करून त्यात जिरे तडतडू द्या. ते झालेले वाटले की मिरची नि कांदा परतून घ्या. कांदा "मस्त तेल मैं फ्राय" करून झाला की त्यामध्ये साबुदाणा व इतर जिन्नस मिसळा व झाकण ठेउन शिजू द्या. साधारण १५/२० मिनिटांनी ते उतरवा व वर ओला खवलेला नारळ आणि "बारीक कटा हुआ हरा धनिया" भुरभुरवून गरम गरम खा.
आणि ती खाऊन "अजि मी आज ब्रम्हांड पाहिले" असे वाटले नाही तर सांगा.
येतो मग,
ब~याच (maybe सगळ्याच) अमराठी लोकांना नुसता वरण भात म्हणजे काय चीज आहे हे कळत नाही. मी त्यांना समजावून थकलोय, seriously. तरी मी, जो थोडासा माझ्यात मराठी नावाचा बाणा उरला आहे, त्याला स्मरून जमेल तसं त्याला market करत असतो, जिथं जिथं chance मिळेल तिथे. पण त्यामुळेच की काय, "एवढंच? च्यायला! आळशी आहेस नुसता!" किंवा "फोडणी नाही दिली तर कसली ती आमटी??" किंवा "आता तुला कळलं असेलच की तू असला कडक्या का आहेस ते" असले टोमणे (of course, हिंदी किंवा इतर भाषेत) मला नवीन नाहीत.
पण, imagine this. कोणतेतरी मस्त तांदूळ (बासमती सोडून), गुरगुट्टया का काय म्हणतात तसे शिजवलेले. तूरडाळ, थोडीशी हळद घालून तीन शिट्टया देउन, थोडंसं मीठ मिसळून आणि अगदी हलक्या हाताने रवीने घूसळून एकसारखी केलेली. एक ताजं लिंबू. आणि तूप, preferably, घरीच लोणी कढवून (आईने - तुम्ही किंवा बाबांनी नाही) केलेलं. साजूक, रवाळ - त्याला तुम्ही काहीही म्हणा. हे सगळे ingredients एकत्र करा, जेवढं तुम्हाला आवडतं तितकं लिंबू पिळा, हातानेच (चमच्याने किंवा forkने नाही) मिसळा. आणि खा. (Duh! अजून काय?)
आहाहा!! ती चव मी कितीही चांगलं लिहून तुम्हाला कळणार नाही, unless तुम्ही मराठी आहात आणि तुमचे preferences सारखं burger, pizza, Chinese वगैरे खाउन आंग्लाळलेले (अबब! कसला शब्द आहे हा!) नसले तर.
signing off,
काही तरी मराठीत लिहावसं वाटलं म्हणून हा सर्व खटाटोप! तर झालं काय, एका मराठी email groupला एक mail लिहील्यानंतर मला आतल्या आत थोडं विचित्र वाटलं.
"रात्री जास्त खाल्ल्यामुळे असेल." माझं खडूस मन, अजून कोण?
"नाही रे बाबा. हा mail वाच."
असंच surf करता करता एक site सापडली. खूप जूनी आणी छान गाणी आहेत इथे. निवांत वेळेत अवश्य़ visit करा.
http://www.aathavanitli-gani.com/
"तुला काहीच चुकीचं वाटत नाही?" – मी.
"तु येडा झालायंस, एवढंच वाटतंय!"
"अबे खजूर ‘तू’ मधला ऊकार दीर्घ आहे, एवढं पण आठवत नाही? तसंच मी पण जूनी आणि आणी हे दोन शब्द चुकवले होते."
"मग?"
"अरे, मग म्हणून काय विचारतोस तोंड वर करून? आपली भाषा आपण नाही नीट लिहीली, तर कोण लिहीणार? तुला काहीच वा़टत नाही?"
"भाऊ, अचानक तुला मराठीचा एवढा पुळका कसा काय?"
अजून तरी याचं उत्तर मला मिळालं नाही.
signing off,