Sunday, February 25, 2007

पॉलिटिकल कथेकरी बुवा

आता मी काही धार्मिक वगैरे नाही (असं म्हणायची फैशन संपली नाही ना?) पण कधी जर कोणी मला देवळात घेऊन गेलं तर मी जातो. कशाला कोणाचं मन वगैरे दुखवा? आणि दुसरं म्हणजे आमचं सर्वात जवळचं देऊळ 20 मैलावर आहे आणि तो रस्ता drive करायला मस्तच आहे. दुधात साखर म्हणायचं तर, थोडा पाऊस पडून गेला होता दुपारीच. असल्या मौसमात अगदी खंडाळ्यात आल्यासारखा गारवा आला होता हवेत आणि मला देवालाही नाही म्हणता आलं नाही.

तर सांगायचं काय, सगळं मस्त माझ्या मनासारखं चाललं होतं. आम्ही देवळात पोचलो आणि रीतीरिवाज पूर्ण केले (you know, नमस्कार, प्रसाद वगैरे). एक कोणीतरी बुवा काहीतरी सांगत होते, ते थोडंसं ऐकून निघू असं मत मांडण्यात आलं आणि आम्ही त्या carpetवर तळ ठोकला.

बुवा रंगात होते. 'आत्मू'उन्नती विषयी ते सांगत होते. (माझं मराठी वाचन पु.लं.पुढे जात नाही) आणि थोडंसं sensibleही वाटलं मला ते. आपण आपल्या शारिरीक गरजांना खूप महत्त्व देतो, खूप काळजी घेतो. बौद्धिक गरजांसाठी शाहरूख खानचे सिनेमे पाहतो. इत्यादी, इत्यादी. पण आध्यात्मिक गरजांसाठी ... (हे बुवांचं नाही, माझं प्रवचन आहे; आत्ताच सांगून टाकतो, नाही म्हणजे नंतर confusion नको!) सांगायचं काय, कदाचित बाकी सगळ्यांनाही ते पटलं असावं की काय, पण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणारा मी एकटाच नव्हतो. बुवांनाही ते जाणवलं. 7-8 जणांचा group जर तुम्ही काय बोलताय याच्याकडे कान टवकारून लक्ष देत असेल, तर तुम्हालाही थोडंसं अवसान येतं आणि तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावर येता. माझी ही theory आहे. कधीतरी prove करीन.

ते आले त्यांच्या सनातन धर्मावर. थोडं Christian आणि ईस्लाम धर्मांशी comparison करून, सनातन धर्म श्रेष्ठ कसा हे अगदी उत्साहात त्यांनी सांगितलं. त्यांच्या बाजूलाच एक आजी बसल्या होत्या. त्या पण देवळाच्या management teamमधल्या दिसल्या. कारण यानंतर लगेचच त्यांनी 'आरतीची वेळ झाली' असं बुवांना बजावलं. माझ्या डाव्या बाजूला बसलेला स आणि माझ्या पुढे बसलेली म यांची नजरानजर झाली आणि दोघेही गालातल्या गालात हसू लागले. मला प्रथम कळलं नाही. नंतर जाणवलं की त्या आजी त्या बुवांच्या better half असल्या पाहीजेत. म्हणूनच म आणि स ला त्या बजावण्यात "been there done that" असं काहीतरी वाटलं असावं. बुवा थोडेसे हिरमूसले, पण अगदी थोडा वेळ. "ये बहोत डरती है, मै जबभी ईस विषयपे आता हूं।" असं काहीतरी बोलून परत चालू झाले. 5-10 मिनिटांनी माझे डोळे थोडेसे जडावले. पूर्ण दिवस हाफिसात काम केल्यावर अजून काय होणार? पण अचानक जेंव्हा मला पं नेहरुंचं नाव ऐकू आलं तेंव्हा मी खडबडून जागा झालो. पं नेहरु?? अमेरिकेतल्या देवळात?

झालं काय, तर बुवा पुनर्जन्म या विषयावर होते. त्यातही Christian आणि ईस्लाम धर्म पुनर्जन्म मानत नसल्याने सनातन आणि झालंच तर हिंदू धर्म श्रेष्ठ कसा हे दुस~यांदा prove झालं. (टाळ्या) नंतर त्यांनी बरंच काही सांगितलं त्याचा सारांश असा - माणूस या जन्मात जे काही करतो ते त्याच्या गतजन्मांचं प्रतिबिंब असतं (वा! वा!) आणि त्यांचा प्वॉईंट असा होता की नेहरू परिवाराने जसं काही आपल्या लोकशाहीवर राज्य केलंय, त्यावरून असं सिद्ध होतं की त्या परिवाराच्या links मागील जन्मी कोणत्यातरी तशाच परिवाराशी असल्या पाहिजेत. म्हणून त्यांच्या मते, पं नेहरु मागील जन्मी रावण (हो, हो, रामानंद सागर यांच्या रामायणातलाच) असलेच असणार.

या वाक्यानंतर आजीबाईनी बुवांना धारेवर धरून आरती करायला लावली हे कालचं शेंबडं पोरही सांगू शकेल. मी माझी केस रेस्ट करतो. त्या बुवांपेक्षा पॉलिटिकल बुवांना मी तरी स्वत: भेटलेलो नाही.

येतो मग,

9 comments:

Abhinav said...

men!
tu barach kahi lihilays! got to catchup now.
barach vachayacha aahe! good :)

nku said...

Man, I am impressed that you still have time for us mortals :-)

Golbguru said...

Incredible, it took me about 10 mins to read it all...must have taken you a lot to write (or I really underestimate what you can do with your mother tongue) :)

Anonymous said...

interesting BUA hote re. Good read. I enjoyed it a lot - GD

nku said...

golbguru, it really took me a long time to type this. And another long time to proofread and correct grammar mistakes. So when I had gone to this temple on Shivratri Friday, I published this on next Sunday :) And I was so determined to find any mistakes in Marathi text, I misspelled a couple of simple English words!

Thanks GD. Nice to see you back!

Invincible said...

I really hate propoganda of any religion to prove "how their religion is the best".

interesting Buwa {:)]

I liked this marathi narration. Good one. Marathi blog vachanyat wegalich majaa aahe (albeit it's time consuming).

nku said...

Invinci: Thanks :)

I enjoy reading in Marathi. Only concerns I have there is folks tend to translate everything into शुद्ध मराठी, which in my opinion is not only difficult to read, but also annoying. Who talks like that??

tmww said...

yeah man!
agadi shudha lihaayacha mhaNtla tar te out of place vaaTel.

apalyaa language cha ha ek problem aahe. rojachyaa vaparatalyaa khoop sarya shabdannaa marathi paryaayi shabdach nahiyet.
for example: sorry. maafi asaavi.. kshamaa ase shabd tar nahi naa vaparu shakat
:))
lihit rahaa...
you are the man!

nku said...

tmww,

That's my point. Even though there are not "good" words to use, folks invent some words and use them. If you remember writings of नारळीकर sir, these folks used to blame him for using English words in his writing. Now that man is trying to write on space science and so on and instead of focusing on the stuff, they want pure language. Duh!